ओझरची कार्गो सेवा संकटात

ओझरची कार्गो सेवा संकटात

नशिक : जिवंत प्राण्यांच्या परदेशातील निर्यातीचा विक्रम घडल्यानंतरही ओझर येथील कार्गो सेवा संकटात सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एचएएलच्या हद्दीत असलेल्या ओझर विमानतळावरून गेल्या वर्षी प्रथमच शेळ्यांची निर्यात सुरु झाली. जिवंत प्राण्यांची अशा प्रकारची हि भारतातील पहिलीच परदेशी निर्यात होती. मात्र, ओझर येथील कार्गो सेवेच्या ठिकाणी असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे केवळ ४५ हजार शेळ्यांची निर्यात होऊ शकली आहे.