मनपाचे २३ नवे इन्क्युबेटर – new 23 incubator

मनपाचे २३ नवे इन्क्युबेटर – new 23 incubator

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाच महिन्यात इन्क्युबेटर अभावी १८७ अर्भक मृत्यू प्रकरणाची महापालिकेनेही गंभीर दाखल घेतली असून महापालिका हॉस्पिटलमध्येहि इन्क्युबेटर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये १७ इन्क्युबेटर असून त्यांची संख्या आता ४० वर नेण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.

महापालिका हॉस्पिटलमध्ये नव्याने २३ इन्क्युबेटर बसवले जाणार असून हॉस्पिटलमधील अर्भकांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर असतांनाही सिव्हिलमध्ये आर्भाक पाठविण्याच्या सूचना देणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याचा इशाराहि आयुक्तांनी दिला आहे.