मनपा देणार इ-सर्टिफिकेट

मनपा देणार इ-सर्टिफिकेट

नाशिक : शहराचा विकास करायचा असेल तर महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणे आवश्यक असून, करवाढ हा एकमेव उपाय आहे. याकरीता सर्व्हेक्षण करण्यात येत असून, करवाढीच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळणे शक्य असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे.

सध्या महापालिकेच्या वतीने २२ नागरी सुविधा केंद्रातून ऑनलाइन सुविधा दिल्या जात असल्या तरी, यापुढे नागरिकांना घरबसल्या ई-सर्टिफिकेट देण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. सिनियर जर्नालिस्ट फोरमच्यावतीने बुधवारी (दि. ११) आयोजित विशेष चर्चेदरम्यान शहर विकासाच्या योजना आणि सद्यस्थिती याविषयी आयुक्त कृष्णा यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. हरीत लवाद, घंटागाडीसह अनेक प्रकल्प सोडविले आहेत, कचरा संकलन वाढले आहे, घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आल्याने यावर नियंत्रण आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अंबड लिंकरोडवरील भंगार बाजाराचा प्रश्‍न सोडविण्यात महापालिकेला यश आले.