मुंबईतील कोळीवाडे होत चालले नष्ट

मुंबईतील कोळीवाडे होत चालले नष्ट

मुंबईचा मूळ भूमिपुत्र कोळ्यांची ओळख पुसली जात
असून सरकार त्यांच्या जमिनी घेऊन एसआरए अंतर्गत कोळीवाडे नष्ट करून
इमारती उभारणार आहेत. कोळी समाजाला स्वतःचा विकास स्वतः करायचा असून
त्यांच्या हक्कावर गदा सरकारने आणू नये,अशी मागणी कोळीवाडा गावठाण
विस्तार कृती समितीचे नेते राजाराम पाटील यांनी केले.
 कोळीवाडे नष्ट करून इमारती बनवून कोळ्यांची ओळख पुसण्याचा प्रकार जोरात
असून आम्हाला मात्र आमचा विकास स्वतः करायचा आहे. सर्व कोळीवाडे यांचे
सीमांकन करून शासनाने त्यांचा हक्क मिळायलाच हवा, अशी मागणी आई गावदेवी
कोळी आगरी ग्राम संस्था आणि भांडुप गाव कोळी आगरी महासंघ यांच्या सभेत
राजाराम पाटील बोलत होते.समुद्रात भरीव टाकून टाकून सर्व जमिनीवर इमारती बनवल्या जात
आहेत,त्यामुळे निसर्गाचे नुकसान होत आहे,याचा मोठा फटका बसणार आहे.
कोळीलोकांचा इतिहास ३०० वर्ष जुना असून इतके जुने वास्तव असणाऱ्या
सरकारने कोळ्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे गरजेचे आहे. यात राजकीय
नेत्यांकडूनही समाधानकारक कम्म केले जात नसल्याने कोळ्यांना स्वतः साठी
स्वतःच लढावे लागत आहे. कोळ्यांचा मासेमारी व्यवसायसुद्धा लयाला जात
असल्याने कोळी तरुणांना रोजगार निर्माण करून देणे महत्वाचे आहे.