महाडमध्ये मुसळधार पाऊस; पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद

महाडमध्ये मुसळधार पाऊस; पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद

रायगड - जिल्ह्यात सतत दोन-तीन दिवसांपासून दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे. महाड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. महाड तालुक्यातील विन्हेरे नातूखिंड रस्त्यावर रेवतळा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. त्यामुळे दापोलीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. अद्याप पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे. जोरदार पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाडमधील रेवतळा येथील नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीचे पाणी पुलावरुन वाहू लागले आहे.यामुळे महाडमार्गे दापोलीकडे जाणारा वाहतुकीचा रस्ता बंद झाला आहे. नदीही तुडूंब भरुन वाहत असून पाणी शेतातही घुसले आहे.