न्यायाधीशांनी दबावात काम करू नये, ते कोणालाही झुकवू शकतात - अण्णा

न्यायाधीशांनी दबावात काम करू नये, ते कोणालाही झुकवू शकतात - अण्णा

अहमदनगर - सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी पत्रकार परिषदे घेऊन जे धाडस दाखवले, त्याचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिली. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, आजचा दिवस काळा असून, काळा डाग अजून गडद झाला आहे. ज्या ठिकाणी धूर निघतो त्याच ठिकाणी आग धुमसत असतो. लोकशाहीसाठी आणि देशातील जनतेला घातक आहे. लोकांनीच रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत अण्णांनी व्यक्त केले. चौघांनी पत्र लिहून व्यथा मांडल्यावर दुर्लक्ष करणे, हे दुर्दैव असल्याचे आण्णांनी म्हटले आहे. न्यायाधीशांनी दबावात काम करण्याची गरज नाही. ते कोणालाही झुकवू शकतात, असे मत आण्णांनी व्यक्त केले आहे.