जयवंत सुतार यांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड

जयवंत सुतार यांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयवंत सुतार यांची अपेक्षेप्रमाणे नवी मुंबईच्या महापौरपदी निवड झाली आहे. आज पार पडलेल्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत सुतार यांना ६७ मते मिळाली. तर, शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांना केवळ ३८ मते मिळाली. सुतार हे नवी मुंबईचे १३ वे महापौर म्हणून आपला कारभार पाहणार आहेत. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी म्हात्रे या निवडून आल्या आहेत. म्हात्रे यांना एकूण ६४ मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांना ३८ मते मिळाली.