पाकिस्तानच्या सीमेवर चुकून प्रवेश केलेला जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतला

पाकिस्तानच्या सीमेवर चुकून प्रवेश केलेला जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतला

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर त्याच्या गावी धुळ्यात परतला आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे  स्वतः त्याला घेऊन धुळ्यात त्याच्या गावी बोरविहीर येथे परतले.  आपल्या गावी आल्यानंतर चंदू चव्हाणला अश्रू अनावर झाले.
 
मृत आजीच्या आठवणीने चंदू चव्हाणचे डोळे पाणावले. त्याने सर्वप्रथम आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार असल्याचं सांगितलं. चंदू जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार नाही, असं चंदूच्या भावाने सांगितलं होतं. आता लवकरच चंदूच्या आजीच अस्थिविसर्जन करण्यात येईल.चंदुला पाकच्या सीमा अधिकार्यांनी पकडल्याच वृत्त कळताच त्या धक्क्यान चंदूच्या आजीचा मृत्यू झाला होता.