गांधीनगरला रामलीलेची जय्यत तयारी

गांधीनगरला रामलीलेची जय्यत तयारी

नाशिक : सर्व धर्मियांचा सहभाग असलेल्या गांधीनगरमधील रामलीलेच्या रंगीत तालमींना सुरवात झाली आहे. नवरात्र काळात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत रामलीला सादर करण्यात येते. गांधीनगरच्या रामलीला मैदानावर सादर होणाऱ्या रामलीला व रावणदहनासाठी येथील कलावंतानी जोरदार तयारी सुरु केली आहे.

समितीचे यंदाचे ६२ वे वर्ष असून दसऱ्याच्या दिवशी होणारा रावणदहन हे येथील मुख्य आकर्षण आहे. गांधीनागार येथे सर्विजानिक दुर्गापूजा समितीतर्फे बंगाली बांधवांचा साजरा होणारा दुर्गा पूजा महोत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या महोत्सवाला ६४ वर्षांची परंपरा असून यंदाही महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यासाठी मंडप उभारणीचे काम सुरु झाले असून दुर्गामातेची मोठी व आकर्षक मूर्ती साकारण्यात मूर्तिकार मग्न आहेत.