कल्याणमध्ये एसटी बस आणि स्कूलबसची सामोरासामोर धडक ; ८ विद्यार्थी जखमी

कल्याणमध्ये एसटी बस आणि स्कूलबसची सामोरासामोर धडक ; ८ विद्यार्थी जखमी

कल्याण : कल्याण मधील दहागाव इथे स्कूल बस आणि एसटी बसची जोरदार धडक झाली.या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. टिटवाळा – बदलापूर हि एसटी बस आणि स्कूल बसचा आज सकाळी आठच्या सुमारास अपघात झाला. दहागाव आरोग्य केंद्राजावाल एसटीने स्कुलबसला धडक दिली. या घटनेत बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व मुल गोवेलीच्या महादेवराव रोकडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघाताच नेमक कारण समजू शकलेल नाही, मात्र या घानेमुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.