इफ्फी फेस्टिव्हलमधून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ सिनेमा वगळला

इफ्फी फेस्टिव्हलमधून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ सिनेमा वगळला

पणजी : 20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फी फिल्म फेस्टिव्हल सुरु होणार आहे. मात्र, हा फेस्टिव्हल सुरु होण्याआधीच वादात अडकला आहे. कारण या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांपैकी दोन चित्रपटांना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून अचानक वगळण्यात आलं आहे. एस दुर्गा’ आणि रवी जाधव यांचा ‘न्यूड’ असे हे दोन चित्रपट आहेत. याप्रकरणी इफ्फीचे ज्युरी प्रमुख सुजॉय घोष यांनीही राजीनामा दिला आहे. तसंच चित्रपट सृष्टीतील अनेकांचा या निर्णयाला विरोध सुरु आहे. न्यूडशिवाय ‘एस दुर्गा’ हा मल्याळम सिनेमाही वगळ्यात आला आहे. गोव्यात २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी हा चित्रपट महोत्सव दरवर्षी रंगतो.