बारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच

बारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच

मुंबई : बारावी परीक्षेच्या मागे लागलेला नष्टर अजून काही थांबत नाही आहे. बारावी पेपरफुटीचे सत्र चालूच आहे.  आज मुंबईमध्ये बारावीच्या कॉमर्स शाखेचा बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सीचा पेपर फुटला आहे. कांदिवलीतील पश्चिमेतील  डॉ.टी.आर.नरवणे विद्यालयात हा प्रकार उघडकीस आला. 

कॉमर्स शाखेच्या बीकेचा आज पेपर होता. परीक्षेचं केंद्र असलेल्या डॉ. टी.आर. नरवणे विद्यालयात दोन विद्यार्थी परीक्षेची वेळ ११ची असूनही  ११.३० ते ११.४५ च्या सुमारास परीक्षेला आले. त्यांच्यावर पर्यवेषकाला संशय आल्याने तपासणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सी विषयाची प्रश्नपत्रिका आढळून आली. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोनही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.