‘युती टिकवायची असल्यास शिवसेनेला विधानसभेत निम्म्या जागा द्या’

‘युती टिकवायची असल्यास शिवसेनेला विधानसभेत निम्म्या जागा द्या’

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ही युती टिकावी यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्यात युतीविषयी चर्चा झाली. यात युती टिकवायची असल्यास शिवसेनेकडून विधानसभेत निम्म्या जागांची मागणी करण्यात आल्याचे कळते.

भाजपकडून अरुण जेटली यांना मध्यस्तीसाठी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले असून, त्यांची आणि शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्यात प्राथमिक बोलणी झाली. विशेष म्हणजे या बैठकीत आम्ही लोकसभेसाठी युती करू. पण, विधानसभा निवडणुकीसाठी २८८ पैकी निम्म्या किमान १४० जागा सेनेला दिल्या पाहिजे, अशी अट देसाई यांनी घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.