‘सिनेमा दाखवणं तुमचं काम; खाद्यपदार्थ विकणं नाही’

 ‘सिनेमा दाखवणं तुमचं काम; खाद्यपदार्थ विकणं नाही’

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्याच्या निर्णयावरून उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्सअसोसिएशनला कठोर शब्दात फटकारले आहे. 'घरच्या किंवा बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालून तुम्ही लोकांना आरोग्यदायी अन्नाऐवजी जंक फूड खायला भाग पाडत आहात', असं सांगतानाच 'सिनेमा दाखवणं हे तुमचं काम आहे. खाद्यपदार्थ विकणं नाही', अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला झापतानाच राज्य सरकारच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. 

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. यावेळी न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनलाही फटकारलं. 'सार्वजिनक ठिकाणी लोक घरचे पदार्थ खातात. त्यावेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का? मग केवळ सिनेमागृहात घरचे पदार्थ खाण्यास बंदी का?' असा सवालही न्यायालयाने केला.