औरंगाबादमध्ये फटाका दुकानांना भीषण आग

औरंगाबादमध्ये फटाका दुकानांना भीषण आग

औरंगाबाद - शहरातील औरंगपूरा भागातील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील सुमारे दीडशे फटाका दुकानांना आज (शनिवार) सकाळी भीषण आग लागली. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वात मोठी फटाक्यांची बाजारपेठ अशी या ठिकाणची ओळख आहे. या मैदानावर सुमारे दीडशे फटाक्यांचे स्टॉल होते. आगीचे लोट पाच किमी अंतरावरून दिसत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.चारचाकी, दुचाकी वाहनेही मोठ्याप्रमाणावर जळाली आहेत. फटाक्यांच्या स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. तीन ते चार किलोमीटरपर्यंत आवाज येत होते. पोलिसांतर्फे परिस्थिती नियंत्रणात आणायचे प्रयत्न करण्यात येत असून, बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.