‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ विरोध

‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ विरोध

'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ उभा ठाकला आहे. हा चित्रपट ब्राह्मणांची व हिंदू प्रथा-परंपरांची बदनामी करणारा असून त्याच्या प्रदर्शनास मनाई करावी, अशी मागणी महासंघानं केली आहे. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केलंय. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगानं अनेक जुनाट बाबींवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आलंय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यामुळं वादळ उठलं आहे. ब्राह्मण महासंघानं या चित्रपटाला आक्षेप घेतला आहे.