नोटाबंदीमुळे मंदी हा कांगावा : चंद्रकांतदादा पाटील

नोटाबंदीमुळे मंदी हा कांगावा : चंद्रकांतदादा पाटील

नोटाबंदीमुळे मंदी आल्याचा केवळ कांगावा करण्यात आला असून, देशात कुठेही महागाई किंवा मंदी नाही, असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. “नोटबंदीमुळे महागाई वाढल्याचा आणि मंदी आल्याचा हा कांगावा असून, देशात कुठेही महागाई आणि मंदी नाही. सर्वसामान्य माणूस खुश झाला आहे”, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. लोक कॅशलेस व्यवहारांकडे मोठ्या प्रमाणात वळले असून, नोटबंदीचा विपरीत परीणाम कुठेच दिसून येत नाही. उलट कॅशलेस व्यवहारांसाठी लोक फॅमिलीअर झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. वर्षानुवर्षे रक्त शोषून ज्यांनी नोटा जमा करुन गादीमध्ये भरल्या, त्यांना त्या नोटा बँकेत जमा कराव्या लागल्याचा दावाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला. दरम्यान, मोदी सरकारने 500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विरोधकांकडून आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला आहे.