‘चला हवा येऊ द्या’ निरोप घेणार!

‘चला हवा येऊ द्या’ निरोप घेणार!

‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो निरोप घेण्याच्या तयारीत आहे.‘चला हवा येऊ द्या’चा होस्ट निलेश साबळेने स्वत: याबाबत सांगितलं. आता थोडी विश्रांती घेणार आहे, असं निलेशने सोमवारच्या एपिसोडमध्ये जाहीर केलं आणि प्रेक्षकांना धक्काच बसला.‘चला हवा येऊ द्या’मधील थुकरटवाडी, यातील श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं. प्रेक्षकांनीही त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. या शोच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं होतं. निलेशचं खुशखुशीत अँकरिंग, भाऊ आणि कुशलची हास्याची जुगलबंदी, भारत गणेशपुरेंनी साकारलेले सरपंच, पोस्टमन काकांच्या रुपात भेटलेला सागर कारंडे प्रेक्षकांना भावला. या पुरुष कलाकारांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारी श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिल.