भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात काळा दिवस - उज्ज्वल निकम

भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात काळा दिवस - उज्ज्वल निकम

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतल्याने देशभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मुकुल मुद्गल, इंदिरा जयसिंह, माजी न्यायाधीश पी. बी सांवत, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आदी विधी जानकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उज्ज्वल निकम -
भारतीय न्यायव्यस्थेतील आजचा दिवस अतिशय काळा ठरला आहे, असे मत उज्ज्वल निकम यांनी मांडले आहे. ते म्हणाले, की आजची पत्रकार परिषद पूर्व उदाहरणावर वाईट परिणाम करणारी ठरेल. न्यायालयाच्या प्रत्येक निकालाकडे आता सर्वसामान्य संशयाने पाहू शकतो. प्रत्येक खटल्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येतील.

पी.बी. सावंत -
माजी न्यायाधीश पी.बी सांवत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की त्या चार न्यायाधीशांना माध्यमांसमोर येऊन असे अभूतपूर्व पाऊल उचलावे लागले. याचा अर्थ असा, की काहीतरी गंभीर वाद सुरू आहे किंवा त्यांच्यातील अंतर्गत वाद आहे.