सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी

सोलापूर महापालिका महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली. १०२ सदस्यांच्या पालिका सभागृहात भाजपच्या नवनिर्वाचित महापौर शोभा बनशेट्टी यांना सर्वाधिक ४९ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना २१ मते पडली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना १८ मते मिळाली.  बसपच्या चौघा सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सोलापुरात भाजपला प्रथमच सत्ता मिळाली आहे. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेनेनेही या निवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला होता. बनशेट्टी यांच्या रूपाने सोलापुरात लिंगायत समाजाला  २५ वर्षांनंतर महापौरपदाची संधी मिळाली आहे.