भांडुप रेल्वे स्टेशनचा तब्बल १६४ वर्षांनी कायापालट

भांडुप रेल्वे स्टेशनचा तब्बल १६४ वर्षांनी कायापालट

 ब्रिटीशकाळात 1853 साली पहिल्या
रेल्वेमार्गात सी.एस.टी, भायखळा, भांडूप व ठाणे या स्थानकांचा समावेश होता.
तब्बल 164 वर्षात दुर्लक्षलेल्या भांडूप स्थानकाचे रूपडे बदलत  असून इतक्‍या
वर्षानंतर स्थानकाच्या कायापलटाचे काम जोरात सुरू आहे.
भांडूप स्थानकाच्या दुरूस्तीसाठी अनेक वर्ष अथक प्रयत्न करण्यात येत होते
परंतु यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. 164 वर्षानंतर या
प्रयत्नांचे चीज झाले असून
मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन कडून भांडूप स्थानकाचे काम सुरू असून यात जुनी
ब्रिटीशकालीन इमारत पाडण्यात आली आहे. येथे तयार होणाऱ्या नवीन पादचारी पुलाचे
काम सुरू आहे. जुन्या इमारतीला ब्रिटीशकालीन लाकडी कमानी हेरीटेज वस्तु म्हणूण
त्या रेल्वेच्या हेरीटेज विभागात जतन करण्यात येणार आहे. येथील स्कायवॉकवर
नवीन तिकीटघर बनविण्यात येत असून यामुळे प्रवाशांना खूप सोयीचे होणार आहे.
भांडूपची लोक संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या स्थानकावर प्रवाशांचा लोढ
वाढत आहे. यामुळे या स्थानकातील आधुनिक रूपांतराने मोठी ऐसपेस आणि प्रशस्त
जागेमुळे प्रवाशांची गैरसोय थांबण्यास नक्कीत मदत होईल. या स्थानकातील दुसऱ्या
प्रवेशव्दाराचे कामही लवकर हाती घेण्यात येणार असून हे प्रवेशव्दार पहिल्या
क्रमांकाच्या फलाटाला जोडण्यात येणार आहे. स्थानकाच्या आजुबाजुला बसणाऱ्या
फेरीवाल्यांना हटविल्याने स्वच्छ व मोकळा परिसर प्रवाशांना ये-जा करण्यास मिळत
आहे.