संभाजी भिडेंबाबत दलित समाजातील आमदारांचे मौन

संभाजी भिडेंबाबत दलित समाजातील आमदारांचे मौन

मुंबई - कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर संभाजी भिंडेविरोधात राज्यभरात तीव्र निदर्शने आणि आंदोलने करण्यात आले होते. या संदर्भात मागील आठवड्यात विधानपरिषदेत जोरदार चर्चाही झाली, त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. या उत्तरामध्ये मुख्यमंत्र्यांनी  कुठेही भिडे यांच्यावरील कारवाईचा उल्लेख केला नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर सभागृहात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांनी कुठलाही आक्षेप न घेता मौन पाळले. यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेदरम्यान भिडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या दलित समाजातील आमदारांच्या आजच्या या मौनावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.