2022 पर्यंत मुंबईत म्हाडाची 50 हजार घरं मिळणार : तावडे

2022 पर्यंत मुंबईत म्हाडाची 50 हजार घरं मिळणार : तावडे

ज्यांना म्हाडाच्या लॉटरीत आता घर लागलं नाही. अशांसाठी खूशखबर आहे. कारण 2022 साली प्रत्येकाला घर ही कल्पना प्रत्यक्षात येईल आणि त्यासाठी एमएमआरडीए परिसरात 50 हजार स्वस्त घर उपलब्ध करुन दिली जातील. असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे. म्हाडाची सोडत विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. उद्याच गोरेगावमधील ५ हजार म्हाडाच्या घरांचं टेंडर निघणार आहे. त्यामुळे ज्यांना आता घर लागणार नाही. त्यांनी नाराज होऊ नये. असंही विनोद तावडे यावेळी म्हणाले. मुंबईतल्या म्हाडाच्या 819 घरांची सोडत आज जाहीर झाली. यात 65 हजार अर्जदारांनी आपलं नशीब आजमावलं.