शोभा डे यांनी ‘पद्मावती’ला केले ‘सद्मावती’

शोभा डे यांनी ‘पद्मावती’ला केले ‘सद्मावती’

मुंबई - पद्मावती चित्रपटाला देशभरात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला सेन्सॉर बोर्ड नाराज आहे, तर संसदीय समितीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संजय लीला भन्साळी यांना लेखी स्वरुपात द्यायची आहेत. दुसरीकडे राजपूत संघटना चित्रपटावर बंदी आणण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पद्मावती चित्रपटाची खिल्ली उडवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आता यात शोभा डे यांची भर पडली आहे. शोभा डे यांनी पद्मावतीचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. मात्र यात पद्मावतीच्या जागी सद्मावती असे लिहलंय आणि दीपिका पदुकोणच्या जागी निरुपा रॉयचा फोटो लावलाय.