अल्पवयीन पत्नीबरोबर शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार - सर्वोच्च न्यायालय

अल्पवयीन पत्नीबरोबर शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - १५ ते १८ वयोगटातल्या पत्नीबरोबर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती मदन बी. लोकुर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, जर लग्नाच्या वर्षभरामध्ये अल्पवयीन पत्नीने  शारिरीक संबंधांबद्दल तक्रार केली असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. याप्रकरणी सर्व पक्षांच्या युक्तिवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबरला निर्णय राखून ठेवला होता. १५ वर्षांवरील पत्नीसोबत पतीनं शरीरसंबंध ठेवल्यास तो बलात्कार होऊ शकत नाही, असं भारतीय दंडविधान कलम ३७५ मध्ये नमूद करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज यासंबंधी दाखल झालेल्या याचिकेवर निकाल देताना ही अपवादात्मक तरतूद रद्द केली आहे. 'इंडिपेंडन्ट थॉट' या सामाजिक संस्थेनं कलम ३७५ मधील तरतुदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही तरतूद रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती.