सात तास विलंबाने मुंबई-अहमदाबाद विमानाचे उड्डाण, प्रवाशांचे आंदोलन

सात तास विलंबाने मुंबई-अहमदाबाद विमानाचे उड्डाण, प्रवाशांचे आंदोलन

मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई- अहमदाबाद विमानाच्या उड्डाणाला ७ तास उशीर झाल्याने प्रवाशांनी आंदोलन केले. या विमानात जवळपास २५० प्रवासी प्रवास करणार होते.

प्रवासी सात तास विमानतळावरच ताटकळत होते. मुंबई विमानतळ प्रशासनाने या प्रवाशांची योग्य ती व्यवस्था न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची व्यवस्था एअर इंडियाकडून करण्यात आली नाही. अखेर प्रवाशांनी आंदोलन केल्यावर सात तासांनंतर मुंबई-अहमदाबाद विमानाने उड्डाण केले.