ट्वीटरकरांनी  परत उडवली राहुल गांधीची खिल्ली

ट्वीटरकरांनी  परत उडवली राहुल गांधीची खिल्ली

उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या आणि आता सा-या देशाचे लक्ष निकालांकडे असताना सर्व माध्यमांच्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये चार राज्यांत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे  चुकीचे आहेत, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात सप-काँग्रेस आघाडीचा विजय हमखास आहे, असे त्यांनी ठासून सांगितले आहे. त्यावर ट्विटरकरांनी त्यांची तुफान खेचली आहे. ‘न्यूज चॅनलवाले’…किमान एक्झिट पोलमध्ये तरी जिंकू द्या, असे राहुल गांधी म्हणत असल्याचे ट्विट करून त्यांची खिल्ली उडवली.

 काहींनी भाजपचीही खेचली आहे. निवडणुका कुणीही जिंकू दे, पण एक्झिट पोलमध्ये नेहमीच भाजपचा विजय होतो, असे ट्विटही करण्यात आले. अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजप सत्तेच्या जवळ जाणार आहे. एक-दोन वृत्तवाहिन्यांचे अंदाज वगळता सर्वच पक्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नसून, क्रमांक एकचा पक्ष नक्कीच ठरेल असा अंदाज वर्तवलेला आहे. मात्र, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीचाच विजय होईल, अशी राहुल गांधी यांना खात्री आहे.