राहुल यांनी घेतली मॅक्रॉन यांची भेट

राहुल यांनी घेतली मॅक्रॉन यांची भेट

नवी दिल्ली - फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन शुक्रवारी चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेसाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली. मात्र यावेळी त्यांच्यात राफेल विमान सौद्यावर चर्चा झाली नाही. याच मुद्यावर त्यांच्या पक्षाने केंद्रातील एनडीए सरकारवर झोड उठवली आहे. त्यांच्यात 'लोकशाहीशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा झाली. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे, की या मुद्यावर ते आपल्या सरकारला उत्तर मागत आहेत. फ्रान्स सरकारला नाही. मॅक्रॉन आणि राहुल गांधी यांच्या भेटीसंदर्भात विचारले असता, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे, की जेव्हा दुसऱ्या एखाद्या देशाचे प्रंतप्रधान वा इतर मंत्री भारताच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा ते विरोधीपक्षाच्या नेत्यालाही भेटत असतात. एवढेच नाही, तर युपीए सरकार असताना, दोन्ही पक्षाची बाजू समजून घेण्यासाठी, देशात येणाऱ्या दुसऱ्या देशाच्या प्रत्येक प्रमुखाला संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्याला भेटता यावे याची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय करत असे. काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रीय हितासाठी, अशा भेटी घेतात, असेही सुरजेवाला म्हणाले.