गुजरातमध्ये ‘विकास’चं काय झालं? राहुल गांधी यांची मोदी वर टीका शस्त्र

गुजरातमध्ये ‘विकास’चं काय झालं? राहुल गांधी यांची मोदी वर टीका शस्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही गुजरातच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर शरसंधान केलं आहे. गुजरातमध्ये 'विकास'चं काय झालं? तो वेडा कसा झाला? असा सवाल करतानाच, 'थापा ऐकून ऐकून 'विकास' वेडा झाला आहे', असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या फटकेबाजीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर अहमदाबाद येथील खेडा येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. एखाद्या शेतकऱ्याला किंवा मुलाला भेटून जर मोदींनी नोटबंदीबाबत विचारले असते तर त्यांनी नोटबंदीला विरोधच केला असता. पण त्यांनी तसे केले नाही, अशी टीका त्यांनी केली. 'गरीब, मजूर, शेतकरी आणि आदिवासींच्या मनातील आम्ही बोलत आहोत. पण सध्याचं सरकार केवळ १० ते १५ उद्योगपतींसाठी काम करत आहे, असं सांगतानाच, आता आम्ही आमच्या मनातलं तुम्हाला सांगणार नाही, तर तुमच्या मनातलं आम्ही ऐकणार आहोत,' असंही ते म्हणाले.