केरळच्या पुरामुळे UAEचे पंतप्रधान चिंतेत

 केरळच्या पुरामुळे UAEचे पंतप्रधान चिंतेत

केरळमध्ये आलेल्या जलप्रलयानंतर भारतातल्या अन्य राज्यांसह जगभरातून येथे मदतीचा ओघ सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीत (UAE) मोठ्या संख्येने मल्याळी लोक कामानिमित्त राहतात. युएईच्या पंतप्रधानांनी केरळला मदतीचे आश्वासन दिले आहे. यासाठी तेथे चक्क एक समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवाय मदतीचे आवाहन करणारे टि्वट युएईच्या पंतप्रधानांनी मल्याळम भाषेत केले आहे. 

पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तूम यांनी केरळची राज्यभाषा मल्याळम मध्ये टि्वट करत लोकांना मदतीचा ओघ अधिकाधिक वाढवण्याचे आवाहन केले आहे. या टि्वटसोबत त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. त्यांनी म्हटलंय की 'केरळचे लोक नेहमीच युएईत आपल्या यशाच्या भाग असतात आणि आजही आहेत. आपल्यावर विशेषत: या पवित्र दिवसांत त्यांना मदत करण्याची विशेष जबाबदारी आहे.'