पाकिस्तानकडून वर्षभरात २८८ वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन

पाकिस्तानकडून वर्षभरात २८८ वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन

नवी दिल्ली: वारंवार बजावूनदेखील पाकिस्तानकडून वर्षभरात २८८ वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन झाल आहे आणि ह्याबाबत खुद्द पाकिस्तानकडूनच प्रोत्साहन दिल्या गेल्याची माहिती सरकारने आज लोकसभेत दिली.

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.गेल्या वर्षी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून २२८ वेळा, तर आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर २२१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. या घटनांमध्ये १३ नागरीक ठार, ८३ जखमी झाले आहेत. तर लष्कराचे आठ जवान शहीद झाले आहेत. तर ७४ जवान जखमी झाले आहेत. याशिवाय या घटनांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद, तर २५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिली. 

या घटना रोखण्यासाठी भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून राजनैतिकदृष्ट्या पाकिस्तानवर दबाब निर्माण केला जात आहे.