सहा वर्षांमध्ये नीरव मोदीला १ हजार २१३ हमीपत्रे मिळाली - अरूण जेटली

सहा वर्षांमध्ये नीरव मोदीला १ हजार २१३ हमीपत्रे मिळाली - अरूण जेटली

नवी दिल्ली - नीरव मोदीला पहिले खोटे हमीपत्र पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतून १० मार्च २०११ ला मिळाले होते. तर पुढील सहा वर्षात अशा प्रकारची १ हजार २१२ हमीपत्रे मिळाल्याची माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.'भारतीय बँकांच्या विदेशातील शाखांमधून कर्ज मिळवण्यासाठी नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांना पीएनबीच्या कर्मचाऱ्यांकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) देण्यात आले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या पीएनबीमधून मोदीला एकाच दिवशी पाच वेळा देखील एलओयू देण्यात आल्याचे उघड झाले आहे,' असे राज्यसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना जेटली यांनी ही माहिती दिली.