केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसचा प्रकोप ; ९ जणांचा मृत्यू

केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसचा प्रकोप ; ९ जणांचा मृत्यू

कोझीकोड - तीव्र तापामुळे केरळमधील कालिकत जिल्ह्यात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. या नऊ जणांपैकी तिघांचा मृत्यू निपाह वायरसच्या आजारामुळे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. इतर सात मृतांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. इतर सात मृतांचे नमुने व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ मणीपाल येथे पाठवण्यात आले आहेत. अधिक चौकशीसाठी जिल्हाधिकारी यू. व्ही. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास समिती नेमण्यात आली आहे,' अशी माहिती एका आरोग्य अधिकाऱ्याने दिली.