सिद्धुंच्या टीव्ही मध्ये काम करण्यावर लागणार बंदी?

सिद्धुंच्या टीव्ही मध्ये काम करण्यावर लागणार बंदी?

चंदीगड : मंत्री असलो तरी टीव्ही शो सोडणार नाही असे म्हणणाऱ्या सिद्धुना कदाचित टीव्ही शोमध्ये काम करण्यावरून बंदी लागू शकते. कारण, नवज्योतसिंह सिद्धू मंत्री असून टीव्ही शोमध्ये सहभागी होऊ शकतात की नाही, याविषयी कायदेशीर सल्ला घेणार अस्लायचं वक्तव्य पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ह्यांनी केल आहे. 

सिद्धू यांनी टीव्हीवर काम करणं सुरु ठेवावं की नाही यावर अॅटर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेईन. संविधानात याबाबत काय तरतूद आहे, हे मला माहित नाही. मंत्री असताना त्यांना हे काम करता येईल का याबाबत वकिलांना विचारणार आहे. हे संपूर्णत: कायद्यावर अवलंबून आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केल.

नवज्योतसिंह सिद्धू हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात आहेत. तसंच सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये ते सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झळकतात. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर स्थानिक प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, संग्रह आणि संग्रहालय यांसारख्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे.