‘नीच’ असलो तरी ‘उच्च’ काम करतो, पंतप्रधान मोदींचा पलटवार

‘नीच’ असलो तरी ‘उच्च’ काम करतो, पंतप्रधान मोदींचा पलटवार

सुरत - सामान्य जनतेसोबत काम करत असल्याने आपल्याला लक्ष्य केले जात असून माझ्यावर असंसदीय भाषेत टीका करणाऱ्यांना जनताच मतपेटीतून उत्तर देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सुरत येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे.
आपली मूल्यव्यवस्था भक्कम -यापूर्वीही गुजरातचा मुख्यमंत्री असताना आपल्याला 'मौत का सौदागर' म्हणून हिणविण्यात आले होते. तरीही देशातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखविला. आपली मूल्यव्यवस्था भक्कम आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना उत्तर देणार नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. 

नेमका वाद काय -
'डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर'च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नेहरु-गांधी घराण्याने डॉ. आंबेडकरांना डावलल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती.