मल्लिका शेरावतने सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत

मल्लिका शेरावतने सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत

मुंबई - अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. नुकताच मल्लिकाने भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना मदत मागितली आहे, की एनजीओ फ्रि-अ-गर्लच्या फाऊंडरला भारतीय व्हिजा देण्याची मदत परवानगी द्यावी.

मल्लिकाने ही मदत सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मागितली आहे. मल्लिका फ्रि-अ-गर्ल इंडिया या संस्थाबरोबर काम करत आहे. ही संस्था भारताच्या मानव तस्करी आणि लहान मुलांचे व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या विरोधात लढत आहे. मल्लिकाने सोमवारी ट्विट करुन म्हटले, 'मॅम सुषमा स्वराज, डच एनजीओ फ्रि-अ-गर्लच्या फाऊंडरचा भारताचा व्हिजा सतत रद्द होत आहे. ही संस्था बाल आणि महिला तस्करीच्या विरोधात उत्तम काम करत आहे. कृपया यांची मदत करा'.