‘राहुल गांधी २०१९ मध्ये असणार भाजपविरोधी गटाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार’

‘राहुल गांधी २०१९ मध्ये असणार भाजपविरोधी गटाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार’

पाटणा - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पक्षाचे अध्यक्ष बनण्याला अजून काही काळ बाकी असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी राहुल गांधींसंदर्भात घोषणा केली आहे. लालू यांनी म्हटले आहे की, २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीत राहुल गांधीच भाजपविरोधी आघाडीचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार असतील. त्यांनी यासाठी आपला व आपल्या पक्षाचा राहुल गांधींना पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. लालू यांनी म्हटले आहे की, गुजरात निवडणुकीत नरेंद्र मोदी रामाच्या नावाने मत मागत असून यावरून भाजप गुजरात निवडणूक हारत असल्याचे मत व्यक्त केले. निवडणूक हरणार असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी रामाच्या नावाने मते मागत असल्याचे म्हटले आहे. लालू यांनी भाजप रामाच्या नावे मत मागून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.