इंडिगोची ४७ उड्डाणे रद्द, डीजीसीएचा दणका

इंडिगोची ४७ उड्डाणे रद्द, डीजीसीएचा दणका

नवी दिल्ली - इंडिगो एअरलाइन्सला आज ४७ उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आदेशानुसार इंडिगोच्या ८, ए-३२० निओ विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. तर गोएयरच्याही ३ विमानांवर उड्डाणासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता या विमानांना उड्डाण करता येणार नाही. कारण महासंचालनालयाने या विमानांच्या इंजिनमध्ये दोष असल्याचे म्हटले आहे. महासंचालनालयाच्या या निर्णयामुळे इंडिगोला १३ मार्चला आपल्या स्थानिक नेटवर्कमध्ये साधारणपणे ४७ विमाने रद्द करावी लागली आहे.  विमानन कंपनीने याची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे.