बंगळुरूहून कोलकात्याला हृदय आणून केले प्रत्यारोपण, पूर्व भारतातील पहिलीच घटना

बंगळुरूहून कोलकात्याला हृदय आणून केले प्रत्यारोपण, पूर्व भारतातील पहिलीच घटना

कोलकाता - बंगळुरूमधील व्यक्तीचे हृदय आणून कोलकात्यातील एका रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. पूर्व भारतातील मानवी हृदय प्रत्यारोपणाची ही पहिली घटना असल्याचा दावा कोलकातामधील खासगी रुग्णालयाने केला आहे. झारखंड येथील ३९ वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बंगळुरूमधून आणलेले हृदय विमानतळावरुन रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॅरिडॉर तयार करण्यात आले होते. यामुळे अत्यंत गर्दीच्या वेळेतही अवघ्या १८ मिनिटात विमानतळावरुन रुग्णालयात हृदय पोहोचले.