पाकिस्तानात २ हजारांच्या बनावट नोटांची छपाई

पाकिस्तानात २ हजारांच्या बनावट नोटांची छपाई

पंजाबच्या अमृतसरमधून १ लाख २० हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश नोटा या दोन हजाराच्या आहेत. या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.पंजाबमधील अमृतसर भागात बनावट नोटा जप्त ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नव्या नोटांचा समावेश आहे. या बनावट नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महताब सिंग आणि निर्मल कौर यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित आहेत.
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

ग्वाल्हेरमध्ये नव्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. याप्रकरणी अभिषेक सिंग नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. याआधीही गुजरात आणि मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात करण्यात आल्या होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. काळा पैसा संपवण्यासाठी, दहशवाद्यांचे आर्थिक पाठबळ नष्च करण्यासाठी आणि बनावट नोटांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. मात्र आता पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.