भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं पण पंजाब आणि गोवा गमावलं

भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं पण पंजाब आणि गोवा गमावलं

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड भाजपने जिंकलं असलं तरी गोवा आणि पंजाब  मात्र गमावलं आहे. गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. एकूण 40 जागांपैकी भाजप 13, काँग्रेस 17, आप 0, गोवा सुरक्षा मंच 3 आणि इतर 7 असं गोवा विधानसभेचं पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तसे संकेतही दिले आहेत.

पंजाबात अकाली दलाशी युती केल्यामुळे भाजपला कॉग्रेसपासून हार पत्करावी लागली आहे. पंजाबमध्ये भाजपला अकाली दल सोबत मिळून १८ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे पंजाब आणि गोव्यात भाजपचा पारड हलक राहिला असून पुढे हा भाजपचा चिंतेचा विषय ठरू शकतो. काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून, अकाली दल नि भाजप १७, आप २० आणि इतर २ जागा आस पंजाबमध्ये निकाल आहे.