दिल्लीमधील वायु प्रदुषण वाढता वाढे

दिल्लीमधील वायु प्रदुषण वाढता वाढे

नवी दिल्ली - दीपावली हा खरे तर आनंदाचा क्षण.. उत्तम आरोग्यामुळे कोणत्याही सणाचा आनंद द्विगुणित होतो. मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी फोडण्यात येणाऱ्या फटाक्‍यांमुळे होणाऱ्या वायु प्रदुषणाच्या पातळीने सुरक्षेचे सर्व मापदंड ओलांडल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही दिवाळीच्या रात्रीस वायुप्रदुषणाचे प्रमाण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून निश्‍चित करण्यात आलेल्या निकषांपेक्षा तब्बल 14 ते 16 पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. हवेच्या गुणतवत्तेची तपासणी करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दिवाळीच्या रात्री दिल्लीमधील वायु प्रदुषणाची पातळी 'अत्यंत गंभीर‘ होती.