भारतीय रेल्वेसाठी आता युरोपियन सिग्नल आणि सुरक्षा यंत्रणा

भारतीय रेल्वेसाठी आता युरोपियन सिग्नल आणि सुरक्षा यंत्रणा

भारतीय रेल्वेने ट्रेन प्रोटेक्शन ऍण्ड वॉर्निंग सिस्टिमचा (रेल्वे सुरक्षा आणि सूचना यंत्रणा) वापर करण्यास सुरुवात केली आहे. थेल्स या फ्रेंच कंपनीकडून या यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. दक्षिण भारतातील अराक्कोनाम भागातील ६८ किलोमीटर रेल्वेमार्गावर रेल्वे सुरक्षा आणि सूचना यंत्रणेचा वापर करण्यात येतो आहे, अशी माहिती थेल्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वे सुरक्षा आणि सूचना यंत्रणेने सज्ज असलेल्या भागाचे लोकार्पण रेल्वेच्या सिग्नल आणि दूरसंचार विभागाचे संचालक अखिल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. चेन्नईतील अंबात्तूर स्थानकात हा कार्यक्रम पार पडला.

युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टिम (ईटिसीएस) भारतात ट्रेन प्रोटेक्शन ऍण्ड वॉर्निंग सिस्टिम (टिपीडब्ल्यूएस) नावाने ओळखली जाते. सप्टेंबर २०१४ मध्ये दक्षिण रेल्वेकडून थेल्सला रेल्वे सुरक्षा आणि सूचना यंत्रणेचे कंत्राट देण्यात आले होते.थेल्ससोबत करण्यात आलेल्या करारानुसार कंपनीकडून ईटिसीची पहिल्या स्तराची यंत्रणा पुरवण्यात आली आहे. याशिवाय डिझाईन, पुरवठा, इन्स्टॉलेशन आणि रेल्वे रुळांजवळील उपकरणेदेखील थेल्सकडून पुरवली जाणार आहे. थेल्सच्या नव्या यंत्रणेमुळे भारतात प्रथमच युरोपियन देशांमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाणार आहे.
‘रेल्वे प्रवासी आणि रेल्वे गाड्यांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सक्षम आणि अत्याधुनिक रेल्वे यंत्रणा भारतात आणल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,’ असे थेल्सचे वरिष्ठ अधिकारी रवीप्रकाश कारचेरला यांनी सांगितले आहे. ‘आम्ही भारतीय रेल्वेला सहाय्य करण्यासाठी उत्सुक आहोत.