ऐतिहासिक विश्वपरिक्रमा पूर्ण करून ‘आयएनएसव्ही तारिणी’ गोव्यात दाखल

ऐतिहासिक विश्वपरिक्रमा पूर्ण करून ‘आयएनएसव्ही तारिणी’ गोव्यात दाखल

पणजी - भारतीय नौदलाचे 'आयएनएसव्ही तारिणी' हे जहाज आज आपली ऐतिहासिक विश्वपरिक्रमा पूर्ण करून गोव्यामध्ये दाखल झाले. या जहाजावरील पथकामध्ये सर्व सदस्य महिलाच होत्या. त्या मागील ८ महिन्यांपासून हा प्रवास करत होत्या. संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी स्वतः नौदलाचे प्रमुख सुनिल लांबा यांच्यासोबत पथकाच्या ६ महिला सदस्यांचे स्वागत केले. आयएनएसव्ही तारिणी हे फक्त महिलांचा सहभाग असलेले भारतातील पहिले पथक आहे ज्याने विश्वपरिक्रमा पूर्ण केली. या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी केले. या पथकात लेफ्टनंट पी. स्वाती, लेफ्टनंट प्रतिभा जामवाल (हवाई वाहतूक नियंत्रण तज्ज्ञ), लेफ्टनंट विजया देवी, सब लेफ्टनंट पायल गुप्ता (दोघीही शिक्षण अधिकारी) आणि लेफ्टनंट बी ऐश्वर्या (नौदलातील वास्तुविशारद) यांचा समावेश होता.