सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद; २ जखमी

सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद; २ जखमी

सुकमा - नक्षलवाद्यांनी घडविलेल्या शक्तिशाली आयईडी स्फोटात ९ सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्याच्या किस्ताराम भागात नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडविला. या स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला. जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर येथे वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांमध्ये एएसआय आर. के. एस. तोमर, मुख्य हवालदार लक्ष्मण आणि हवालदार अजय यादव, मनोरंजन लंका, जितेंद्र सिंह, शोभित शर्मा, मनोज सिंह, धर्मेंद्र सिंह, चंद्रा एच. एस. यांचा समावेश आहे.