फोर्टिस रुग्णालयाने 25 लाखांची ऑफर दिली, आद्याच्या वडिलांचा दावा

फोर्टिस रुग्णालयाने 25 लाखांची ऑफर दिली, आद्याच्या वडिलांचा दावा

गुरुग्राम : हरियाणाच्या फोर्टिस रुग्णालयात डेंग्यू उपचारांसाठी 16 लाख रुपयांचं बिल भरुनही सात वर्षांच्या मुलीचा मृत्यूप्रकरणात नवं वळण आलं आहे. कायदेशीर कारवाई रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने 25 लाखांची लाच दिल्याचा दावा मुलीचे वडील जयंत सिंह यांनी केला आहे.फोर्टिस रुग्णालय आता हे प्रकरण दडपण्याचा आणि आपल्या चुका लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. “फोर्टिस रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी मला भेटले आणि 10 लाख 37 हजार 889 रुपयांचा चेक घेण्याची ऑफर दिली,” असंही चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं. इतकंच नाहीतर तर या अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयंत सिंह यांनी केला आहे. हे पैसे घेतल्यानंतर कायदेशीर करार करण्यास त्यांनी सांगितलं. या प्रकरणातील कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर जाहीर करायची नाही, तसंच हे प्रकरण कोर्टात घेऊन जायचं नाही, अशा अटी या करारात घातल्याचं जयंत सिंह म्हणाले.