२०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन - पंतप्रधान

२०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन - पंतप्रधान

नवी दिल्ली - क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकार गतिमानतेने पाऊले उचलत आहे. पूर्वीच्या तुलनेत देशात क्षयरोग निर्मूलनाचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे देशातून क्षयरोगाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी २०२५ हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दिल्लीत 'क्षयरोग निर्मूलन परिषदे'चे आयोजन  करण्यात आले होते. या परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. विविध राज्यांचे मंत्री तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिषदेला उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी क्षयरोगाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी किमान ४० वर्षे प्रयत्न करावे लागतील. मात्र, पुढील वर्षभराच्या आत ९० टक्क्यांपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.