या शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा

या शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा

पती-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केले जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. पुराणांनुसार चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडावयाचा असतो. आजच्या करवा चौथची पूजा करण्यासाठी ५ वाजून ४३ मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे. सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत ही पूजा करता येऊ शकतो. तर ८ वाजून ५० मिनिटांनी चंद्राला अर्घ्य देता येऊ शकते. साजश्रृंगार करुन मोठ्या भावभक्तिने हा उपवास केला जातो.
करवा चौथच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्यासोबतच महिलांनी शंकर-पार्वती, कार्तिकेय आणि गणपतीची आराधना करावी. या उपवासामध्ये तांदूळ, उडदाची डाळ, श्रृंगाराची सामग्री हे सर्व एका साहित्य एकत्र ठेवून पतीच्या आईला दिले जाते.