ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय

ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी पौष्टिक पर्याय

ऑफिसमध्ये हे पोषक अन्न घेणे कधी-कधी कठीण ठरते. घड्याळ्यात चार वाजले की आपल्याला भूक लागायला लागते आणि आपण ऑफिसमधील जंक फूड खायला जातो. ऑफिसमध्ये तोंडाला पाणी आणणारे अनेक पर्याय असतात. पण हाय कॅलरी आणि साखरेचे पेय घेतल्याने तुम्हाला आळस आल्यासारखे वाटते. यामुळे शरीरातील ऊर्जादेखील कमी होते.तुम्हाला आपल्या फिटनेसची काळजी आहे. परंतु रोज तीच ती फळे खाणे कंटाळवाणे वाटते. सकाळी निघताना इतकी घाई असते की एक्स्ट्रा नाश्ता बनवण्याचा प्रश्नच येत नाही. मग काय करायचे ? ही काही झटपट नाश्त्याच्या पदार्थांची यादी आहे. यामुळे तुमचा जास्त वेळही खर्च होणार नाही आणि पोषक पदार्थही पोटात जातील.

१. बदाम व शेंगदाणे
मूठभर बदाम व शेंगदाणे तुमची भूक घालवण्यासोबतच दैनंदिन प्रोटिनची कमी पूर्ण करतील. यासाठी तुम्हाला फक्त हवाबंद डब्यात बदाम व शेंगदाणे साठवून ठेवावे लागतील. अधिक चविष्ट बनवण्यासाठी थोडे भाजून त्यावर मीठ व मीरेपूड घाला.

२. कडधान्य
कडधान्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटिन असलेले कडधान्य हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या जीभेला चटपटीत खाण्याची सवय असेल तर त्यात थोडा कांदा, काकडी, टोमॅटो व मिर्ची चिरून टाका.

३. लाह्या किंवा मुरमुरे
मुरमुऱ्यांपासून बनवलेली भेळ किंवा चाट कोणाला आवडत नाही. जर तुम्हाला भेळ बनवायची नसेल तर मुरमुऱ्यांमध्ये फक्त काकडी, टोमॅटो, शेंगदाणे, हिरवी मिर्ची व मीठ मिसळून खा. पोहे बनवणे हा देखील एक झटपट पर्याय आहे. पण तुम्ही तेही करू शकता नसाल तर डाएट चिवड्याचे पॅकेट खरेदी करा.

 ४. ओट्स
ओट्स बनवणे खूप सोपे आहे. हे ओट्स म्हणजे विकत मिळणारे प्रिझर्वेटिव्ह असलेले ओटमील नव्हे. ओट्स घेऊन पाणी किंवा दुधात शिजवा. यासाठी दहा मिनिटेदेखील वेळ लागणार नाही.

५. फळे
 रोज तीच ती फळे खाणे कंटाळवाणे ठरते असे जरी असले तरी फळे खाऊच नका असे आमचे म्हणणे नाही. रोज वेगवेगळी फळे खा. किंबहुना सफरचंद व पिनट बटरही उत्तम कॉम्बिनेशन आहे.