निपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावले

निपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावले

नाशिक : निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. वटवाघुळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक असल्याचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांतून झाला. त्यामुळे फळांविषयी माणसांच्या मनात भितीचे वातावरण पसरल्याने आहे. तेव्हापासून निपाहच्या भितीने फळांची मागणी घटली आहे. सध्या अधिकमास आणि रमजान सुरू असूनही फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.